विस्कटलेले नाते पुन्हा सावरले.

Date:


Read Event Report

Author: Arpita Joshi (Nagpur), Junior intern,Niche Advocacy Foundation.

लॉकडाऊन च्या काळात मी माझ्यातील कौशल्याचा विकास करण्याचे ठरवले. रोज नवनवीन पेंटींग बनवणे, गाण्याचा रियाज करणे किंवा रोज चविष्ट पदार्थ बनवणे एवढच नही तर या आधी कधिही नृत्य देखील केले नव्हते पण ते देखील शिकले. आणि मग काय, या सगळ्याचे फोटोस किंवा वीडियोज़ बनवून इंस्टाग्राम, फेसबुक, वॉट्सएप्प इत्यादींवर टाकलेत. लोकांच्या कौतुकाचा वर्षाव झाला. हिच कौतुकाची थाप माझ्यातील लपलेल्या कौशल्यांचे अन्वेषण करण्यास प्रोत्साहन करत होती. आणि एक उत्तम संधी मिळाली. NICHE Advocacy Foundation च्या इंटर्नशीप चा भाग होण्याची ती संधी. इंटरव्यू झाला आणि इंटर्नशीप सुरु झाली. डॉ. पूर्णिमा मॅडमनी आम्हा इंटर्नससाठी एक उत्तम Intensive Training Module बनवले होते. आम्ही रोज एका नवीन कौशल्यावर चर्चा करायचो. काय योग्य आणि काय अयोग्य इथपासून ते वेगवेगळे कार्य देऊन आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मॅडमने मदत केली.

या Intensive Training Module मध्ये विषय आला तो म्हणजे Relationship Management. या विषयवार चर्चा करताना मला बरेच प्रश्न ही पडलेत आणि सोबतच अश्याकाही प्रश्नांची उत्तरे मिळालीत ज्याचा शोध मी खुप आधी पासुन घेत होते. त्याचच एक छोटस उदाहरण म्हणजे आपण कितिदा एखाद्याची मस्करी करताना त्याला नको ते बोलून जातो. शब्दांच भानच राहात नाही. सहज बोलताना अनेक नको त्या गोष्टींवर विषय जातो आणि मस्करीचं वादात रुपांतर होत. कित्येकदा “मी मस्करी करत आहे” किंवा “चल ना यार आपल्यात इतकी गम्मत चालतेच ना” असं बोलून विषय टाळतो. पण याने समोरचा दुखावला गेला याचा विचारच करत नाही. बरेचदा तर भांडण झल्यावर “भांडण केल्याने प्रेम वाढत” असं म्हणतो. नक्किच हे खर आहे पण आपण का भांडतोय याचा विचारच करत नाही. मुळात त्या भांडणात मी कशी बरोबर आहे याची भावना असते. आणि याने नात्यात दुरावा निर्माण होतो.

आमची ऑनलाइन चर्चा संपली आणि मी या सगळ्यांचा विचार करत बसले. माझ्या लक्ष्यात आले की कित्येकदा मी देखील चुकले आणि अशीच काही करणे देऊन विषय टाळला आणि समोरचा दुखावल्या गेला. तर या लॉकडाऊन च्या काळात टाकलेल्या सगळ्या फोटोस आणि वेडीयोस वर सगळ्यात जास्त कौतुक तर माझ्या त्याच लोकांनी केलय जे अगदी माझ्या जवळचे आहेत आणि त्यांनाच मी कधितरी दुखवले आहे. मी पुन्हा त्या सगळ्यांशी संपर्क साधला. आणि सॉरी माझे तेव्हा चुकलेच अस म्हणून विस्कटलेले नाते सावरले.

Leave a Comment